Last Updated: Tuesday, November 8, 2011, 17:36
झी २४ तास वेब टीम, मुंबई राज्यात अनेक ठिकाणी उद्या पोलीस भरती आहे आणि त्यासाठी उद्या शारिरीक चाचणी आहे. पण वेबसाईट हँग झाल्यामुळे उमेदवारांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागत आहे. उद्याच्या भरतीची हॉल तिकिटे मिळाली नाहीत. पोलीस मुख्यालयातून कोणतीही माहिती देण्यात येत नसल्याने उमेदवार संभ्रमात पडले आहेत. मोबाईलवर मेसेज येईल असं सांगण्यात आलं पण अद्याप कोणताही मेसेज उमेदवारांना मिळाले नाहीत. राज्यभरात इंटरनेट कॅफे उमेदवारांनी मोठी गर्दी केली आहे.
First Published: Tuesday, November 8, 2011, 17:36