राज ठाकरेंची बोचरी टिका - Marathi News 24taas.com

राज ठाकरेंची बोचरी टिका

झी 24 तास वेब टीम, मुंबई







 
शरद पवारांचे सासरे अजित पवारांचे आजोबा कसे काय होऊ शकतात अशी खास राज ठाकरे शैलीतली टिका राज ठाकरेंनी केली. शरद पवारांचे सासरे रणजी क्रिकेटपटू होते आणि ते आपले आजोबा होते असं विधान अजित पवारांनी केलं होतं.
अजित पवारांनी मागच्या आठवड्यात लातूरात उध्दव आणि राज ठाकरेंवर हल्ला चढवला होता त्याला सडेतोड प्रत्युत्तर राज ठाकरेंनी दिलं. दारा सिंगही उद्या त्यांचे आजोबा असतील कारण शरद पवार कुस्तीगीर संघटनेचेही अध्यक्ष आहेत  असाही टोला राज ठाकरेंनी लगावला.
आनंद परांजपेंना मनसेत प्रवेश करायचा होता आणि ते संपर्कात होते याबद्दल राज ठाकरेंना विचारलं असता माझ्या घराबाहेर 24 तास पोलिस असतात त्यांची साक्ष काढता येईल. राज ठाकरेंनी एकप्रकारे मनसेचे आमदार राम कदम यांची पाठराखण केली आहे.

First Published: Tuesday, November 22, 2011, 15:43


comments powered by Disqus