Last Updated: Saturday, April 14, 2012, 14:24
www.24taas.com, मुंबई, नागपूर राज्यात सरकारी पातळीवर आणि अनेक संघटनांनी आज बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीच्या पार्श्वभुमीवर पिंपरीच्या लोखंडे सभागृहात अनोखं रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आलयं. महामानवाबरोबरच गौतमबुद्ध, ज्योतिबा फुले यांच्या मनमोहक रांगोळ्या रेखाटण्यात आल्यायेत. त्याला नागरिकांची चांगलीच दाद मिळत आहे.
चैत्यभूमीवर बाबसाहेबांना मानवंदना १२१ व्या जयंती निमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. राज्यासह देशातल्या कानाकोप-यातून दादरच्या चैत्यभूमिवर बौद्धबांधव बाबसाहेबांना मानवंदना करण्यासाठी आलेत. मुंबईतल्या चैत्यभूमीवर कालपासूनच बौद्ध अनुयायांची गर्दी होती. परिसराला यात्रेचं स्वरुप आलय. दुसरीक़डं नागपूरच्या दिक्षाभूमीवरही बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.
काल रात्री दीक्षाभूमी परिसरात मनमोहक अशी विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. आज सकाळपासूनच दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयायी आलेत. दीक्षाभूमीवरच बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळं दादरच्या चैत्य़भूमीएवढचं नागपूरच्या दीक्षाभूमीला महत्व आहे. दादरची चैत्यभूमी, नागपूरची दीक्षाभूमी, महाडचे चवदार तळं या ठिकाणी बौध्द अनुयायांची गर्दी झाली आहे.
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीनागपूरच्या दीक्षाभूमीवरही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी बौद्ध अनुयायींची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 14 ऑक्टोबर 1956 साली लाखो बौद्ध अनुयायींसह बाबासाहेबांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवरच बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 121व्या जयंतीनिमित्त पुण्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. यानिमित्त हजारो अनुयायांनी आंबेडकरांना आदरांजली वाहिली. यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात आली. तर दुसरीकडे सांगलीतही डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. पहिल्यांदाच अशाप्रकारे पुष्पवृष्टी होत असल्याने नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
इंदुमिलचा प्रश्न सोडवणार - मुख्यमंत्रीइंदुमिलचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी आज चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन केलं. यावेळी इंदूमिलबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. याबाबत दोन बैठका झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. पर्यावरणाचे काही नियम बदलावे लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. शिवाय डॉ. बाबासाहेबांचं आतंरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक कसं असावं याबाबत दलित सामाजिक संघटनांसोबत विचारविनियम सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
First Published: Saturday, April 14, 2012, 14:24