राज्यात महामानवाला अभिवादन

Last Updated: Saturday, April 14, 2012, 14:24

१२१ व्या जयंती निमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. राज्यासह देशातल्या कानाकोप-यातून दादरच्या चैत्यभूमिवर बौद्धबांधव बाबसाहेबांना मानवंदना करण्यासाठी आलेत. मुंबईतल्या चैत्यभूमीवर कालपासूनच बौद्ध अनुयायांची गर्दी होती. परिसराला यात्रेचं स्वरुप आलय. दुसरीक़डं नागपूरच्या दिक्षाभूमीवरही बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.

समुद्रातच होणार शिवस्मारक, वाट पाहा- पृथ्वीबाबा

Last Updated: Monday, March 19, 2012, 19:42

गेल्या आठवड्यात पर्यावरण खात्याने परवानगी नाकारल्याने अरबी समुद्रात शिवस्मारक होणार नाही, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याला खोडत शिवस्मारक अरबी समुद्रातच होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानपरिषदेत दिली.

शिवस्मारक : मुख्यमंत्री आज देणार उत्तर

Last Updated: Monday, March 19, 2012, 11:09

अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या शिवस्मारकावरून मागील आठवड्यात विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला, मुख्यमंत्री उत्तर देण्याची शक्यता आहे.

'कृपा' माझ्या संपर्कात - मुख्यंमत्री

Last Updated: Saturday, March 3, 2012, 12:28

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गोत्यात आलेल्या कृपांचा कांगावा सुरू केला आहे. मी कुठलीही चूक केली नाही, न्यायालयीन लढाई लढणार, जप्त केलेली संपत्ती माझी नाही, असे सांगून कृपाशंकर सिंहानी हात झटकले आहेत. दरम्यान, अज्ञातवासात असलेले कृपाशंकर सिंह मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत.संपर्काबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच कबुली दिली आहे