नानाने मोडले 'कंबार' यांचे 'कंबरडे' - Marathi News 24taas.com

नानाने मोडले 'कंबार' यांचे 'कंबरडे'

झी २४ तास वेब टीम 
 
ज्ञानपीठ विजेते कन्नड साहित्यिक डॉं. चंद्रकांत कंबार यांनी मराठी भाषेबद्दल द्वेषभावनेने केलेल्या वक्तव्याने त्यांचावर चौफर टीकेचा भडीमार होत आहे. सीमाभागातील मराठी भाषकांचा जन्म केवळ गोंधळ घालण्यासाठीच झाला आहे, अशी मराठीद्वेषाची गरळ ओकणार्‍या कंबाट यांच्या विरोधात आज संतापाची लाट उसळली.
 
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी कंबार यांच्यावर कडक शब्दांत आसुड ओढले. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी तर हा तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. अशाने वितुष्ट आले तर अराजक माजेल, अशी भीती व्यक्त करत कंबार यांच्यावर जहरी टीकाच केली आहे.
 
नाना पाटेकर यांनी कंबाट यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी  कंबार यांना चांगलेच सुनावले आहे. ज्ञानपीठ विजेत्या व्यक्तीकडून तरी अशी वक्तव्ये करू नयेत, ‘ज्ञानपीठ’सारखा बहुमान केवळ लिखाण केले म्हणून होत नाही. तुम्ही सर्वस्पर्शी आहात म्हणून तुम्हाला हा गौरव मिळतो. ज्ञानपीठासारखा पुरस्कार मिळवणार्‍या साहित्यिकाने तरी बोलताना खूप सांभाळून बोलावे. शेवटी तुमच्या ताटात वाढलंय ते तुम्हाला खावंच लागेल ही सक्ती कशी चालणार. दैन्य कितीही असले तरी आपण तुष्टच राहिले पाहिजे. ज्या दिवशी वितुष्ट येईल त्या दिवशी अराजक माजल्याशिवाय राहणार नाही.

First Published: Wednesday, November 23, 2011, 13:04


comments powered by Disqus