Last Updated: Monday, November 28, 2011, 09:16
झी 24 तास वेब टीम, मुंबईज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे जनलोकापाल विधेयकासाठी केलेल्या उपोषणामुळे जगभरात पोहचले. आता लवकरच अण्णा हजारे प्रतिष्ठेच्या टाईम मासिकाच्या कव्हरवर हजेरी लावतील असं त्यांच्या एका सहकाऱ्याने सांगितलं.
टाईम फोटोग्राफरची टीम शनिवारी राळेगण सिध्दीत दाखल झाली आणि अण्णा हजारे राहतात त्या यादवबाबा मंदिरात त्यांचे विविध अँगल्यमधून फोटो काढले.टाईमच्या टीमने पुढील काही अंकामधल्या एकात अण्णा हजारे कव्हवर हजेरी लावतील असं अण्णांच्या सहकाऱ्याने न्यूज एजन्सीला सांगितलं.
अण्णांच्या जनलोकापाल विधेयकाच्या मोहिमेने भारतातील यूवकांना जागृत करण्याचे मोठं काम केलं. पण केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील भारतीयांना अण्णांच्या मोहीमेला पाठिंबा दर्शवला. टोकियो आणि कॅलिफोर्निया येथील भारतीयांनी सोशल नेटवर्किंग साईटस आणि ऑनलाईनच्या माध्यमातून अण्णांच्या आंदोलनात सहभाग घेतला.
पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्ते नुकतेच अण्णांच्या भेटीसाठी राळेगण सिध्दीत दाखल झाले होते आणि त्यांनी आपल्या देशातील सिविल सोसायटी मोहिमेला मार्गदर्शन करण्याची विनंती केली. तसंच पाकिस्तान भेटीचे निमंत्रणही दिलं. मागच्या आठवड्यात लोणावळा येथील सेलिब्रिटी वॅक्स म्युझिममध्ये अण्णांचा मेणाचा पूतळा ठेवण्यात आला आहे.
First Published: Monday, November 28, 2011, 09:16