महाराष्ट्र झाला ७० टक्के लोडशेडींगमुक्त - Marathi News 24taas.com

महाराष्ट्र झाला ७० टक्के लोडशेडींगमुक्त

www.24taas.com, मुंबई
 
महाराष्ट्र जवळजवळ ७० टक्के लोडशेडिंगमुक्त झाला आहे असा दावा महावितरणने केला आहे. राज्यभरातील १४२ पैकी ९४ विभाग लोडशेडिंगमुक्त झाल्याचं महावितरणतर्फे सांगण्यात आलं आहे.
 
तसंच राज्यातील उद्योगांना यापुढे २४ तास वीजपुरवठा मिळेल, असंही सांगण्यात आलं आहे. याबरोबरच धार्मिक आणि पर्यटन स्थळांना २४ तास वीजपुरवठा असेल, असंही महावितरणतर्फे सांगण्यात आलं आहे.
 
यामध्ये जेजुरी, शिर्डी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर तसंच महाबळेश्वर, अलिबाग, माथेरान, लोणावळा या ठिकाणी २४ तास वीजपुरवठा राहिल, असं सांगण्यात आलं आहे.
 
 
 

First Published: Thursday, May 10, 2012, 12:35


comments powered by Disqus