मुंबईत आघाडीला वार्ड वाटपात अडचणी! - Marathi News 24taas.com

मुंबईत आघाडीला वार्ड वाटपात अडचणी!

www.24taas.com,मुंबई
 
दोन्ही काँग्रेसनं आघाडीची घोषणा केली असली तरी वॉर्ड वाटप करताना मात्र नाकीनऊ आलंय. आजच्या बैठकीतही मोठा खल होऊन वॉर्ड वाटपाचा तिढा सुटलेला नाही. आता सोमवारी पुन्हा दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार आहे.
 
 
गोरेगावच्या वॉर्ड क्रमांक 50 वर दोन्ही पक्षांनी दावा केलाय.... खासदार गुरुदास कामत यांचे भाचे आणि काँग्रेसचे नगरसेवक समीर देसाई यांच्यासाठी काँग्रेसला हा वॉर्ड हवाय तर राष्ट्रवादीनं कामगार नेते शरद राव यांचे पुत्र शशांक राव यांच्यासाठी हा वॉर्ड मागितला आहे.
 
 
सुमन नगरच्या वॉर्ड नंबर 143 या वॉर्डवरही दोन्ही पक्षांनी दावा सांगितलाय. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक रवींद्र पवार यांच्यासाठी पक्षानं प्रतिष्ठा पणाला लावलीय. त्यातून अजुनही तिढा निघत नाही आहे.   बंडखोरी टाळण्यासाठी ऐनवेळी जागावाटप जाहीर करण्याची रणनिती आखण्यात आलीय. मात्र काही वॉर्ड्सवरून जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीए. आता सोमवारच्या बैठकीत काही तरी प्रगती होण्याची अपेक्षा आहे.

First Published: Friday, January 13, 2012, 19:44


comments powered by Disqus