Last Updated: Thursday, January 19, 2012, 18:26
www.24taas.com, मुंबई 
निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे, त्यामुळे आयोगाचा अपमान म्हणजे राज्याचा अपमान आहे, असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी नाराजी व्यक्त केली. आयोगाच्या निर्णयाबाबत क्षेप असल्यास न्यायालयाचा मार्ग मोकळा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांना आचारसंहिता भंग प्रकरणी क्लीन चिट दिल्यानंतर राज ठाकरे यांनी अत्यंत कडक शब्दात निवडणूक आयोगावर टीका केली होती. अशा निवडणूक आयोगाचं लोणचं घालायचं का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
First Published: Thursday, January 19, 2012, 18:26