Last Updated: Monday, March 26, 2012, 16:52
राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवारांनी सन २०१२-१३ च्या अर्थसंकल्पात एकीकडे घरगुती गॅसवर पाच टक्के कर वाढवल्याने त्याची झळ सर्वसामन्यांना बसणार आहे. तर दुसरीकडे राज्यातील विभागवार विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच विविध सामाजिक घटक, ग्रामीण आणि शहरी भागातील पायाभूत सूविधांसाठी तरतूदीकडे लक्ष दिलं आहे. यंदाचा अर्थसंकल्प दोन हजार कोटी रुपयांच्या आर्थिक तूटीचा आहे. विक्रीकर संकलनात २० टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत चार हजार कोटी रुपयांनी अधिक आहे.