आनंद शिवसेनेत मावेना रं मावेना.... - Marathi News 24taas.com

आनंद शिवसेनेत मावेना रं मावेना....

www.24taas.com, मुंबई

ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या फोडाफोडी फोडीच्या राजकारणात शरद पवार यांनी आज शिवसेनेला जबरदस्त झटका दिला आहे. कल्याण डोंबिवलीचे खासदार आनंद परांजपे आज शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत नाट्यमयरित्या दाखल झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
 
यावेळी आनंद परांजपे यांनी शिवसेनाप्रमुखांबद्दल आदर व्यक्त केला. मात्र, शिवसेनेच्या सध्याच्या कार्यप्रणालीबद्दल टीकेची झोड उठवली. आनंद परांजपे अद्यापही शिवसेनेत असून त्यांनी पवारांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे.
 
शिवसेनाप्रमुख माझे दैवत आहेत. परंतु, बाळासाहेबांना अपेक्षित असलेली शिवसेना राहिलेली नाही. शिवसेनेत निष्ठावान शिवसैनिकांची गळचेपी होती. तसेच आपल्याला स्थानिक नेतृत्वाकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याची खंत त्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
 
शिवसेनेत विकासाचे राजकारण होत होते. आता सत्तेचे राजकारण केले जाते. आता शिवसेनेनं नेहमी विकासाला विरोध केला आहे. परंतु, पवार साहेबांनी नेहमी आम्हांला सहकार्य केले आहे. आता आपली व्यथा मांडायला पवार साहेबांकडे आलो आहे, ही सदिच्छा भेट असल्याचे परांजपे यांनी स्पष्ट केले.
 

 
 
पवारांनी असा केला गेम.....

 
 

First Published: Friday, January 20, 2012, 17:42


comments powered by Disqus