Last Updated: Saturday, January 21, 2012, 16:03
www.24taas.com, मुंबई 
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गेली अनेक दिवस सुरू असणाऱ्या आघाडी गाडी आज कुठे रूळावर आली आहे. आज मुंबईतला आघाडीचा वॉर्डवाटपाचा तिढा सुटला आहे. त्यानुसार आता वॉर्ड क्रमांक ५० , ५६ काँग्रेसला मिळाला आहे.
तर वॉर्ड क्रमांक ५८ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला आहे. या दोन वॉर्डवरून आघाडीत तिढा होता. यावरून वाद प्रतिवाद सुरु होते. वॉर्ड क्रमांक ५० हा काँग्रेसचे नेते गुरुदास कामत यांनी त्यांचे भाचे समीर देसाई यांच्यासाठी हवा होता. त्यासाठी समीर देसाई आणि राष्ट्रवादीचे कामगार नेते शरद राव यांचा मुलगा शशांक यांच्यात चुरस होती.
मुंबईतील ज्या दोन जागांवरून वाद होता त्यावर यशस्वी तोडगा काढण्यात आला आहे. त्याचबरोबर बदललेल्या आरक्षणाच्या पद्धतीमध्ये ज्या पक्षाचा उमेदवार सक्षम असेल, त्या ठिकाणी अदलाबदली होऊ शकते असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
First Published: Saturday, January 21, 2012, 16:03