Last Updated: Saturday, January 21, 2012, 17:54
www.24taas.com, मुंबई 
मुंबईत काल झालेल्या 'आनंद नाट्या'मुळे शिवसेनेला कृषीमंत्री शरद पवारांनी चांगलाचा धक्का दिला, त्यामुळे आज मातोश्रीवर ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर बोलताना प्रताप सरनाईक यांनी आनंद परांजपेंचा चांगलाच समाचार घेतला. 'हिंमत असेल तर खासदारकीचा राजीनामा द्यावा' असं खुलं आव्हानच प्रताप सरनाईक यांनी दिलं आहे, मात्र त्याचबरोबर याविषयाकडे दुर्लक्ष करीत सरनाईकांनी 'आनंद परांजपे हा विषय आमच्या दृष्टीने संपला', असं स्पष्ट केले.
ठाण्यातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक झाली. खासदार आनंद परांजपें राष्ट्रवादीच्या आश्रयाला गेल्यानं त्याविषयी चर्चा करण्यात आली. ठाण्यातले शिवसेनेचे प्रमुख नेते या बैठकीला हजर होते. परांजपे यांच्या पवित्र्यानं ठाण्यात पक्षाला धक्का बसु नये अशी रणनिती आखण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्यानं शिवसेना काळजीपुर्वक रणनिती आखत आहे.
आनंद परांजपे यांनी राजीनामा देईन निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान शिवसेनेनं पुन्हा दिल आहे. पक्षासाठी आता हा विषय संपला असून नव्या जोमानं शिवसेना निवडणुकीला सामोरं जाईल असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला.
First Published: Saturday, January 21, 2012, 17:54