Last Updated: Tuesday, January 24, 2012, 11:30
www.24taas.com, मुंबई '

निवडणूक आयोगाचं काय लोणचं घालायचं का' ? या राज ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाने चांगलीच दखल घेतली आहे. निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी राज ठाकरे यांना धोक्याची सुचनाच दिली आहे.
राज ठाकरेंनी यापुढे निवडणूक आयोगाची अवहेलना केली तर त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते, असा इशारा राज्याच्या निवडणूक आय़ुक्त नीला सत्यनारायण यांनी दिला आहे. विलेपार्ले इथल्या एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आयोगाचे लोणचे घालायचे आहे का असे विधान केले होते.
या विधानाची गंभीर दखल घेत यापूर्वीच राज यांना आयोगाकडून समज देण्यात आली आहे. तर आता यापुढे त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केले तर त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते असा इशारा दिला आहे. राजकीय पक्षांसाठी असलेल्या नियम आणि आचारसंहितेत निवडणूक आयोगाची आपल्या पक्षाकडून अवहेलना होणार नाही याचाही समावेश आहे. याची आठवण सत्यनारायण यांनी राज यांना करून दिली आहे.
First Published: Tuesday, January 24, 2012, 11:30