Last Updated: Wednesday, December 14, 2011, 16:18
दबंग स्टार सलमान खान आता सूरज बडजात्याच्या सिनेमात रोमाँटिक भूमिका साकारणार आहे. लागोपाठ हिट ऍक्शन सिनेमा देणाऱ्या सलमान एका अर्थाने आपल्या मुळांकडे परतत आहे. मागच्या वर्षीच्या अखेरीस सलमानने सूरज बडजात्याची भाची विधी कासलीवालच्या इसी लाईफ मैं मध्ये काम केलं होतं. फिल्म इंडस्ट्रीत त्यावेळेसच सलमान परत एकदा बडजात्या कॅम्पच्या सिनेमात काम करणार अशी चर्चा सुरु झाली होती.