ठाण्यात धर्मराज्यचे मनसेला आव्हान - Marathi News 24taas.com

ठाण्यात धर्मराज्यचे मनसेला आव्हान

www.24taas.com, कपिल राऊत-ठाणे
 
ठाण्यात उमेदवारी यादीनंतर मनसेमध्ये अनेकजण नाराज झालेत. या नाराजांनी आता बंडखोरी करत राजन राजे यांच्या धर्मराज्य पक्षाकडे आपला मोर्चा वळवला आहे. धर्मराज्य पक्षानेही या नाराजांना उमेदवारी देऊ केल्यानं निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे...
 
ठाण्यात मनसेची अधिकृत उमेदवारी यादी जाहीर झाली आणि उमेदवारी न मिळालेल्या नाराजांचा उद्रेक झाला. या नाराजांना आता याआधीच मनसेला सोडचिठ्ठी देत स्वतंत्र पक्षाची स्थापना करणा-या राजन राजे यांनी आपल्याकडे आकर्षित केलंय. सच्चा कार्यकर्त्यांची मनसेत घुसमट होतेय, असं सांगत चांगल्या कार्यकर्त्यांना आम्ही संधी देत असल्याचं राजन राजे म्हणताहेत.
 
आम्ही आंदोलनं करून आमच्यावर केसेस झाल्या, त्यावेळी आमची परीक्षा घेतली नाही, मग तिकीटं देतानाच परीक्षा का, अशी खदखद या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलीय...मनसेत नाराज असलेल्या श्रीकांत मानेंना धर्मराज्य पक्षानं उमेदवारी देऊ केलीये. एकूणच ठाण्यात आता मनसेचे आजी-माजी कार्यकर्ते आमनेसामने उभे ठाकले आहेत.
 

 
 
 

First Published: Monday, February 6, 2012, 19:12


comments powered by Disqus