Last Updated: Sunday, February 12, 2012, 19:29
www.24taas.com,ठाणे 
कळव्यात वीजेचा शॉक लागून राष्ट्रवादी काँग्रेसचे चार कार्यकर्ते ठार झाले आहेत. लोखंडी झेंडा घेऊन कार्यकर्ते जात असताना वीजेचा धक्का लागला. राष्ट्रवादीचे उमेदवार महेश साळवींच्या प्रचार आणि रॅलीला जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.
कळव्यात या घटनेत आठ जण जखमी झाले आहेत त्यापैकी दोघेजण गंभीर आहेत. कळव्यात रॅलीला जाताना ही दुर्घटना घडली. जखमींना कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मृतांची नावे
१) प्रदीप गुप्ता वय वर्षे- ३५
२) अजय पहाडीराजा, वय वर्षे- २१
३) अशोक पहाडीराजा. वय वर्षे- ११
४) अण्णा पहाडीराजा, वय वर्षे- ३५
First Published: Sunday, February 12, 2012, 19:29