उद्धवच 'अजित' की 'पृथ्वीं'चे राज ? - Marathi News 24taas.com

उद्धवच 'अजित' की 'पृथ्वीं'चे राज ?

www.24taas.com, मुंबई 
 
उद्धव ठाकरे- अस्तित्वाची लढाई
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार असलेल्या उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक अस्तित्वाची लढाई
- मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे १६ वर्षे राज्य
- छायाचित्रणाचा छंद मनापासून जोपासणाऱ्या उद्धव ठाकरेंची या विषयावरची दोन पुस्तके प्रकाशीत
- सुरवातीच्या काळात पडदयामागचे सूत्रधार असलेले उद्धव ठाकरेंची २००२ साली शिवसेनेचे कार्याध्यक्षपदी नेमणूक
- २००२ आणि २००७ साली शिवसेनेच्या यशाचे मुख्य श्रेय उद्धव ठाकरेंकडेच जाते
- शांत, शालीन आणि संयत व्यक्तीमत्व असलेले उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उग्र प्रकृतीशी आणि आक्रमक शैलीच्या अगदी विरुध्द टोक
- काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे कडवे आव्हान एक बाजूला तर दुसऱीकडे राज ठाकरेंच्या मनसेच्या झंझावाताशी सामना
- मुंबई महापालिकेवर ताबा ठेवण्यासाठी राज्यातील २७ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांकडे दुर्लक्ष
 
उद्धव ठाकरेंची निवडणुकीची रणनिती
- काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी रामदार आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाशी हातमिळवणी
- निवडणूक प्रचार मोहिमेत महापालिकेने केलेल्या विकास कामांना ठळक प्रसिध्दी
निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देताना बंडखोरी आटोक्यात ठेवण्यात यश
उत्तर भारतीयांच्या विरोधात आक्रमक भूमिके घेणं टाळत राज ठाकरेंवर मात्र कडाडून हल्ला
 
 
राज ठाकरे- नेतृत्वाची सत्वपरीक्षा
- राजकीय जीवनाचा श्रीगणेशा करतानाच आपले काका बाळासाहेब ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकण्याचा निश्चय
- सोमवारी काका आणि पूतणे यांच्यातील प्रचारयुद्धात राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना मात दिल्याची चर्चा
- बाळासाहेब ठाकरेंची भाषण शैली, अंदाज, आक्रमता याची हुबेहुब प्रतिकृती असल्याने युवावर्गाला आकृष्ट करण्यात यश
- मुंबई आणि ठाण्यात मनसेला जास्तीजास्त जागा मिळवत स्वत:चे स्थान बळकट करण्याचे आव्हान
- महापालिका निवडणुकीत अपयश पदरी आल्यास राज ठाकरेना कार्यकर्त्यांचे मनोबल राखण्याची कसरत करावी लागेल
- मुंबई शिवसेनेचे शक्तीस्थान असल्याने मनसेला सेनेची ताकद खच्ची करण्याची नामी संधी साधावी लागेल
निवडणूक रणनिती
- आक्रमक वक्तृत्वशैलीने काकांपेक्षा पूतण्या सवाई असल्याचं सिध्द
- मुंबईकर मराठी माणसाला भावनिक आवाहन करण्याची असाधारण क्षमता
- उत्तर भारतीयांविरोधात मोहिम तूर्तास स्थगित
- निवडणुकीत मराठी माणसालाच उमेदवारी
- नागरी प्रश्न, विकास कामातील भ्रष्टाचारावर प्रचाराचं लक्ष केंद्रित
- नवीन पक्ष असल्याने कोरी पाटी आणि त्यामुळेच सर्व पक्षांना टार्गेट करणं शक्य
- नवीन पक्ष असल्याने मतदारांना संधी देऊन बघा हे पटवण्यात यश
 
अजित पवार- एकच लक्ष्य मुख्यमंत्रिपद
- २००४ सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या असताना मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला तेव्हा काकांनी चूक केली असं मत
- जे घडलं त्यात बदल करता येणं शक्य नाही त्यामुळेच आता जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रित
- स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या माध्यमातून स्वत:च स्थान बळकट करण्याची व्यूहरचना
- मुंबईत काँग्रेससोबत आघाडीचा आग्रह, सेनेचं खच्चीकरण आणि राष्ट्रवादीचा लाभ असा सरळ हिशेब
- नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकांच्या निवडणीकतल्या यशाचे शिल्पकार
- एकाधिकारशाही आणि हम करे सो कायदा अशा कार्यपद्धतीमुळे पक्षातच विरोधकांची संख्या मोठी
- जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत अपयश आल्यास अजितदादाच टार्गेट असतील हे नक्की निवडणूक रणनिती
- काँग्रेससोबत आघाडीचा आग्रह. महापालिका निवडणुकीत अधिक लाभ पदरात पडण्याची शक्यता नसली तरी २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकांवर नजर
- सर्व पक्षातल्या असंतुष्टांना राष्ट्रवादीत खेचण्याची आक्रमक रणनिती
- राजकीय डावपेच आखण्यात वाकबगार. एकीकडे बंडखोरांना छुपं पाठबळ, दुसरीकडे सढळ हाताने पक्षनिधीचे वाटप
 
पृथ्वीराज चव्हाण- एकांडा सेनानी
- शिवसेना-भाजपला मुंबई महापालिकेतून सत्ताभ्रष्ट करण्याचा अजेंडा. राष्ट्रवादीसोबत आघाडीचा निर्णय
- महापालिका निवडणुकीतल्या यशाने मासलिडर असल्याचे दाखवून देण्याचा निर्धार
- भगव्या शक्तींचा पाडावाची हायकमांडच्या इच्छापूर्ती करण्याचा मानस
- निवडणुकीतल्या यशावर पृथ्वीराज चव्हाणांचे भवितव्य अवलंबून
- अंतर्गत बंडाळीला रोखण्याची कसरत करावी लागील, तिकिट वाटपानंतरच्या बंडखोरीला मात्र लगाम घालु शकले नाही
- असंतुष्ट नाराज नेते काँग्रेस प्रचारापासून दूर राहिल्याने सर्व मदार पृथ्वीराज चव्हाणांच्या खांद्यावर
निवडणूक रणनिती
- मुंबई, ठाणे, नाशिक आणि नागपुरात सेना-भाजपला एकट्याने पराभूत करु शकत नसल्याच्या वास्तवाची जाणीव त्यामुळेच राष्ट्रवादी सोबत आघाडी
- स्थानिक नेतृत्वाला उमेदवार निवडीचे स्वातंत्र्य दिल्याने कमी प्रमाणात बंडखोरी
- मतदारांना आकृष्ट करण्यासाठी स्वच्छ प्रतिमेचा कौशल्याने वापर
- केंद्रात आणि राज्यात काँग्रेस सरकार असल्याने शहरांना योजनांचे लाभ मिळतील हा प्रमुख प्रचार मुद्दा
- राष्ट्रवादीशी लढत असलेल्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर हल्ला चढवताना आक्रमक भूमिका
 
 
 

First Published: Wednesday, February 15, 2012, 14:41


comments powered by Disqus