Last Updated: Sunday, February 19, 2012, 21:13
www.24taas.com, ठाणे ठाण्यात सत्ता संघर्षाला वेगळं वळण लागलं आहे. बसपाचे दोन नगरसेवक बेपत्ता झाल्या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदेंच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकनाथ शिंदेंवर या नगरसेवकांना पळवून नेल्याचा आरोप आहे.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ अ आणि ब मधुन निवडून आलेल्या सुशीला यादव आणि विलास काबंळे या दोघा नगरसेवकांना सांयकाळी ५ च्या सुमारास इनोव्हा गाडीत घालुन पळवून नेण्यात आल्याचं बसपाच्या नेत्यांचे म्हणणं आहे.
First Published: Sunday, February 19, 2012, 21:13