दहा वर्षाच्या चिमुरडीचं शौर्य, अपहरण हाणून पाडलं10-yr-old rescues herself from kidnapper by jumping

दहा वर्षाच्या चिमुरडीचं शौर्य, अपहरण हाणून पाडलं

दहा वर्षाच्या चिमुरडीचं शौर्य, अपहरण हाणून पाडलं
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबई महिलांसाठी किती असुरक्षित आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. मुंबईतल्या डोंगरी परिसरातून सकाळी सातच्या सुमारास एका शाळकरी मुलीचं अपहरण करण्यात आलं. मात्र या धाडसी मुलीनं प्रसंगवधान राखत स्वता:ची सुटका तर केलीच शिवाय मोठ्या शिताफीनं त्या अपहरणकर्त्यांना पकडूनही दिलं.

राजू मेहबूब खान हा काळ्या बुरख्या आड दडलेला दिसतोय. शुक्रवारी सातच्या सुमारास राजूनं एका नऊ वर्षाच्या शाळकरी मुलींचं अपहरण केलं. तुला शाळेत सोडतो असं आमिष दाखवून
लाल मारूती व्हॅनमधून तो तीला पळवून नेत होता..

मात्र गाडी शाळेच्या नव्हे तर भलत्याच दिशेनं जात असल्याचं लक्षात येता त्या चिमुरडीनं मोठ्या शिताफीनं धावत्या गाडीतून उडी घेतली आणि स्वतःची सुटका केली.

नेमकी याच वेळी पाठून येणाऱ्या एका वाहन चालकाच्या हा प्रकार लक्षात आला त्यानं ताबडतोब त्या चिमुरडीला सोबत पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी चेंबुर नाक्याजवळ सापळा लावून राजूला ताबडतोब ताब्यात घेतलं..

मुळचा कानपूरचा असलेला राजू सध्या गोवंडी परिसरात राहतो. उदरनिर्वाहासाठी गाडी चालवण्याचा व्यवसाय करणाऱ्या राजूनं मुलीचं अपहरण का केलं याचा पोलीस तपास करताहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


पाहा व्हिडिओ



First Published: Saturday, December 21, 2013, 15:38


comments powered by Disqus