Last Updated: Saturday, December 21, 2013, 15:49
मुंबई महिलांसाठी किती असुरक्षित आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. मुंबईतल्या डोंगरी परिसरातून सकाळी सातच्या सुमारास एका शाळकरी मुलीचं अपहरण करण्यात आलं. मात्र या धाडसी मुलीनं प्रसंगवधान राखत स्वता:ची सुटका तर केलीच शिवाय मोठ्या शिताफीनं त्या अपहरणकर्त्यांना पकडूनही दिलं.