Last Updated: Friday, June 13, 2014, 17:15
www.24taas.com, झी मीडिया, ठाणेमराठा आरक्षणाचा निर्णय येत्या 21 जूनला जाहीर करण्यात येईल, असं ठाम आश्वासन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज विधान परिषदेत दिलं. मराठा आरक्षणाचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना राणेंनी ही माहिती दिली.
मराठ्यांना 20 टक्के आरक्षण देण्याबाबत मी ठाम असल्याचंही राणेंनी स्पष्ट केलंय. मराठा आरक्षणाबाबत शिफारस करण्यासाठी नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने मराठ्यांना 20 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. मात्र मुस्लिम समाजालाही आरक्षण देण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे मराठ्यांना 16 टक्के आणि मुस्लिमांना 4 टक्के असं आरक्षण देण्याचा विचार सरकार पातळीवरू सुरू असल्याचं समजतंय. दुसरीकडे राणेंनी 20 टक्के आरक्षण देण्यावर ठाम असल्याचं जाहीर केल्यामुळं यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता सध्या लागू आहे. ही आचारसंहिता 20 जूनला संपतेय. त्यानंतर लगेचच 21 जूनला मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल, असं राणेंनी स्पष्ट केलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, June 13, 2014, 17:15