Last Updated: Tuesday, November 26, 2013, 13:18
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. या जखमा मुंबईकर कधीच विसरणार नाहीत. आज पोलीस जिमखान्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शशी थरूरही उपस्थित होते.
पोलीस अधिकारी, विविध देशांचे राजनैतिक अधिकारी यांच्या उपस्थित हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी हुतात्म्यांचे नातलगही उपस्थित होते.
या हल्ल्यात सहभागी असलेला अतिरेकी अजमल कसाब जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आलं. त्याच्यावर रितसर खटला चालवून त्याला फासावरही चढवण्यात आलंय. मात्र मुंबईकरांची ही जखम भरून येणार नाही. आजही मुंबई सुरक्षित आहे का याचीच भीती मनात घेऊन मुंबईकर रोजची कामं करत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, November 26, 2013, 13:18