ट्रेनमधून खाली पडून २ ठार, २ जण गंभीर जखमी , 4 people fall down from train in mumbai

ट्रेनमधून खाली पडून २ ठार, २ जण गंभीर जखमी

ट्रेनमधून खाली पडून २ ठार, २ जण गंभीर जखमी
www.24taas.com, मुंबई
मध्य रेल्वे मार्गावर चालत्या रेल्वेमधून चार जण खाली पडले. यापैंकी दोघांचा मृत्यू झालाय तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. सायन-माटुंगा रेल्वे मार्गावर ही दुर्दैवी घटना घडलीय.

आज सकाळी १० – ११ च्या सुमारास मध्य रेल्वेनं प्रवास करत असताना सायन – माटुंगा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वेतून खाली पडून चार जणांना आपला जीव गमवावा लागलाय. हे चारही जण वाढत्या गर्दीचे नाहक बळी ठरलेत. ट्रेनच्या छतावर बसून काही लोक प्रवास करत होते. त्यापैंकीच हे चौघंही होते. छतावरून खाली घसरल्यानं ते ट्रेनच्या ट्रॅकवर पडले.

त्यानंतर तातडीनं या चौघांनाही सायन हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. अपघातग्रस्तांपैकी दोघांचा मृत्यू झालाय तर इतर दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.

First Published: Thursday, October 11, 2012, 12:41


comments powered by Disqus