‘कॅम्पा कोला’ वासियांना मिळाली अखेरची नोटीस!, 488 notice to campa cola residents

‘कॅम्पा कोला’ वासियांना मिळाली अखेरची नोटीस!

‘कॅम्पा कोला’ वासियांना मिळाली अखेरची नोटीस!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

‘कॅम्प कोला’ रहिवाशांना महापालिकेनं ४८८ कलमाअंतर्गत नोटीस बजावलीय. वारंवार नोटीस बजावूनही घराच्या चाव्या महापालिकेकडं सुपुर्त न केल्यामुळं ही नोटीस बजावण्यात आलीय.

आता 17 जूनला सकाळी साडेअकरा नंतर महापालिका धडक कारवाई करेल, असं या नोटीशीद्वारे रहिवाशांना स्पष्ट करण्यात आलं आहे. मुंबई महापालिका 17 जून म्हणजे मंगळवारपासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करणार आहे.

एकूण तीन टप्प्यांमध्ये ही कारवाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पाणी,वीज आणि गॅस कनेक्शन तोडले जाईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये अनधिकृत फ्लॅटमधील भिंती तोडल्या जातील. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरीत इमारतीचा भाग पाडण्यात येईल.

कॅम्पा कोलाचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी महापालिकेनं दोन वेळा टेंडर काढूनही त्याला प्रतिसाद न मिळाल्यानं अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या सहाय्यानं आता कारवाई पार पाडली जाणार आहे. एकीकडं राज्य सरकारनं कॅबिनेट बैठकीत अॅटर्नी जनरलचे कॅम्पा कोलावर मत मागविण्याचा निर्णय घेतला असताना दुसरीकडं पालिका प्रशासन मात्र कारवाईवर ठाम आहे.




* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 14, 2014, 20:09


comments powered by Disqus