Last Updated: Monday, June 16, 2014, 19:38
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`कॅम्पा कोला`वर मंगळवारी कारवाई होणार नाहीय. उद्याची कारवाई रद्द करण्यात आलीय. आता १९ जूननंतरच ही कारवाई होण्याची शक्यता आहे.
महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी ही माहिती दिलीय. कॅम्पाकोलावर 17 जूनपासून कारवाई करण्यासाठी महापालिकेनं 488 ची नोटीसही कॅम्पाकोला रहिवाशांना बजावली होती. पण `कॅम्पा कोला`मधल्या 83 वर्षांच्या विनोद कोठारी यांचा आज मृत्यू झाला. त्यामुळे उद्याची कारवाई पुढे ढकलण्यात आलीय.
उद्या विनोद कोठारी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. `आपल्या राहत्या घरावर कारवाई होणार, या भीतीनेच कोठारी यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला` असा आरोप कॅम्पा कोला रहिवाश्यांनी केलाय. गेल्या वर्षभरातला हा कॅम्पाकोलामधला चौथा मृत्यू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, June 16, 2014, 19:22