‘आप’नंतर मनसेच बाप तर राष्ट्रवादी आई!, `Aap`, then MNS Bap Or NCP Mother

‘आप’नंतर मनसेच बाप तर राष्ट्रवादी आई!

‘आप’नंतर मनसेच बाप तर राष्ट्रवादी आई!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

जनतेला आई-बाप मिळाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. आम आदमी पार्टीचा प्रभाव देशभर वाढत असताना राज ठाकरेंनी मात्र आपबिप काही नाही, राज्यात मनसेच बाप असल्याचं सांगितलंय. तर राज ठाकरेंच्या दाव्याला राष्ट्रवादीनं जोरदार उत्तर देत मनसे बाप तर राष्ट्रवादी जनतेची आई असल्याचं प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलंय.

राष्ट्रवादी पक्ष स्वत:ला कधी बाप समजत नाही. आमची भूमिका आईसारखी आहे. महाराष्ट्रातील जनताही आमचं कुटुंब आहे असं स्पष्टीकरणही मलिक यांनी केलं. दरम्यान, राज यांनी अगोदर नरेंद्र मोदींची भाषणं ऐकावीत आणि मग टीका करावी, असं प्रतीउत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिल आहे.

तसंच मुख्यमंत्री असूनही मोदींनी देशांच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत आहे. देशभरात प्रचार करत आहे. लाखो लोकं त्यांना ऐकायला येत आहे. त्यामुळे मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असा सल्ला कुणी देण्याची गरज नाही असे फडणवीस म्हणाले. राज यांनी मोदींनी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर राजीनामा देण्याची गरज होती, असं म्हटलं होतं.

दिल्लीत आपने चमत्कार केलाय. ते महाराष्ट्रात निवडणुकीला उतरले तर...त्यावर राज यांनी आम्ही बाप आहोत, असं म्हटलं. त्याला उत्तर राष्ट्रवादीने आई असल्याचे सांगून दिले. त्यामुळं ऐन निवडणुकीत जनतेला आई-बाप मिळाल्याचं राजकीय चित्र सध्या राज्यात दिसतंय.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 9, 2014, 19:13


comments powered by Disqus