Last Updated: Tuesday, December 24, 2013, 18:59
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई नेव्हीच्या जहाजाने धडक दिल्याने समुद्रात मच्छिमारी करणाऱ्या अलसौबान या बोटीला जलसमाधी मिळालीय. काल रात्री ही घटना दापोली तालुक्यातल्या हर्णे बंदरात घडलीय. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
या बोटीवर २७ खलाशी होते. नेव्हीच्या जहाजाने धडक दिल्यानंतर मच्छिमारी नौकेला काही मिनिटात जलसमाधी मिळाली.
नेव्हीच्या एन ४० या जहाजाने या बोटीला धडक दिलीय. अल सौबान ही बोट मिरकरवाडा बंदरातली आहे.२७ खलाशांना आज रत्नागिरीत आणण्यात आलं. यातील २ खलाशी गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
First Published: Tuesday, December 24, 2013, 17:55