काश्मीरमध्ये ‘मिग-21’ला अपघात, पायलटचा मृत्यू

Last Updated: Tuesday, May 27, 2014, 15:24

श्रीनगरच्या अनंतनागमधल्या मधमासंगम परिसरात एअर फोर्सचं मिग-21 विमान दुर्घटनाग्रस्त झालंय. त्यात पायलटचा मृत्यू झालाय. मृत पायलटचं नाव रघू बन्सी हे आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या ट्विट करुन दुर्घटनेच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला.

‘ऑल राइट, गुड नाइट’ हेच वैमानिकाचे अखेरचे शब्द!

Last Updated: Thursday, March 13, 2014, 12:30

‘ऑल राइट, गुड नाइट’ असे शब्द व्हिएतनामच्या ‘हो ची मिन्ह’ इथल्या विमानतळ अधिकार्‍यांच्या कानावर पडले आणि काही क्षणांतच विमान रडारवरून नाहीसे झाले आणि अधिकार्‍यांची एकच धावपळ उडाली.

बेपत्ता मलेशिया विमानाचा आता अंदमान सागरात शोध सुरू

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 14:35

बेपत्ता मलेशिया विमानाचं गूढ आणखी वाढत चाललंय. संपर्क तुटण्यापूर्वी बहुतेक विमानानं आपली दिशा बदलली होती, ते पुन्हा परतीकडे वळलं होतं. आता बेपत्ता विमानाच्या तपासाचं अभियान अंदमान सागरात सुरू आहे. शेकडो किलोमीटर समुद्रात याचा शोध आतापर्यंत घेण्यात आलाय.

कल्याणमध्ये ४ घरांवर दरड कोसळली, ७ जखमी

Last Updated: Thursday, March 6, 2014, 09:21

कल्याण पूर्वेला असलेल्या नेतीवली परिसरातील चार घरांवर दरड कोसळल्याने प्रचंड खबराट पसरली. दरडीमुळे चारही घरं पूर्ण उध्वस्त झालीत. या दुर्घटनेत ७ जण जखमी झालेत.

मुंबईत कारने ८ जणांना उडवले, १ ठार

Last Updated: Thursday, February 13, 2014, 20:07

मुंबईत चारकोप भागात भरधाव कारने आठ जणांना उडवलं आहे, यात एकाचा मृत्यू झाला आहे. काका केणी बस थांब्यावर उभ्या असलेल्या ८ प्रवाशांना उडवल्याची घटना ही बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

नेव्हीच्या जहाजाची बोटीला धडक

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 18:59

नेव्हीच्या जहाजाने धडक दिल्याने समुद्रात मच्छिमारी करणाऱ्या अलसौबान या बोटीला जलसमाधी मिळालीय. काल रात्री ही घटना दापोली तालुक्यातल्या हर्णे बंदरात घडलीय. रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

आश्रमशाळेत प्रशिक्षण, धूम ३ स्टाईलने चार विद्यार्थी जखमी

Last Updated: Sunday, December 8, 2013, 14:59

चंद्रपूर जिल्ह्यातील एका दिवंगत माजी मंत्र्याच्या परिवाराच्या खासगी आश्रमशाळेत धूम ३ ने धुमाकूळ घातलाय. आश्रमशाळेतील या धूम ने ४ विद्यार्थ्यांना थेट रूग्णालयात पोहचलंय. आश्रमशाळेतील अधीक्षकाच्या पित्याने नव्या को-या चारचाकी वाहनाचे प्रशिक्षण सुरु केले होते. ते आता त्यांच्या अंगलट आलं आहे.

मंगला एक्सप्रेस अपघात : जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल

Last Updated: Friday, November 15, 2013, 15:10

इगतपुरीजवळ घोटी इथं आज सकाळी साडेसहाच्या सुमारास रेल्वे अपघात झाला. या अपघातात ३ जण ठार झालेत २९ प्रवासी जखमी आहे. जखमींना घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मंगला एक्सप्रेस अपघात : अनेक गाड्या रद्द, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

Last Updated: Friday, November 15, 2013, 13:41

नाशिकजवळ घोटी येथे मंगला एक्स्प्रेस झालेल्या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या मनमाडहून दौंड मार्गे मुंबईकडे वळविण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून तीन ठार झाल्याचे सांगितले आहे.

मंगला एक्स्प्रेस अपघातात पाच ठार

Last Updated: Friday, November 15, 2013, 12:14

मुंबईकडे येणाऱ्या मंगला एक्स्प्रेस अपघातात पाच ठार झालेत. इगतपुरी येथे मंगला एक्स्प्रेसचे चार डबे रुऴावरुन घसरल्याने हा अपघात झाला.

सचिनच्या शेवटच्या मॅचची तिकिटविक्री करणारी वेबसाईट क्रॅश!

Last Updated: Monday, November 11, 2013, 19:23

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अखेरच्या टेस्ट मॅचसाठी आजपासून तिकीटविक्रीची सुरूवात होणार होती. मात्र ऑनलाईन तिकीटविक्री करणारी वेबसाईट क्रॅश झाल्यानं सध्या क्रिकेटप्रेमींना तिकीटांसाठी वाट पाहवी लागत आहे

मुरबाडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं, पाचही जण ठार

Last Updated: Sunday, September 29, 2013, 13:16

ठाणे ग्रामीण भागातील टोकवडे इथल्या नाणेघाट भागातील जंगलात एका हेलिकॉप्टरला अपघात झालाय. वीजेच्या तारेला धडकून या हेलिकॉप्टरला अपघात झालाय. मुंबईहून औरंगाबादकडे निघालेलं युनायटेड हॅचरीज कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं.

स्पेनमधील रेल्वे अपघातात ६० ठार

Last Updated: Thursday, July 25, 2013, 12:02

स्पेनमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेत ६० लोकांचा बळी गेला असून १०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. रेल्वे रूळावरून घसरल्याने हा अपघात झाला.

नगर-पुणे अपघातात ५ ठार

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 12:37

अहमदनगर-पुणे रस्त्यावर शिक्रापूरजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार तर पाच जण जबर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.

MPSC विद्यार्थ्यांबद्दल संवेदनाशून्य!

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 20:54

एमपीएससीचा सर्व्हर दोन आठवड्यांपूर्वी क्रॅश झाला होता. परीक्षा चार दिवसांवर आली असताना पुन्हा एकदा सर्व्हर क्रॅश झाल्यामुळे अभ्यास सोडून परीक्षांचे फॉर्म्स पुन्हा भरावे लागणार आहेत.

MPSCचा सर्व्हरच क्रॅश, सर्व डेटा करप्ट!

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 20:19

एमपीएससी परीक्षेवर अभूतपूर्व संकट ओढवलय. एमपीएससीचा सर्व डेटा करप्ट झालाय. एमपीएससीचा सर्व्हरच क्रॅश झालाय. यामुळं विद्यार्थ्यांना पुन्हा फॉर्म भरावे लागणार आहेत.

क्रेनला धडक : लंडनमध्ये हेलिकॉप्टर कोसळले

Last Updated: Thursday, January 17, 2013, 11:29

दक्षिम मध्य लंडनमध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरील क्रेनवर टक्कर लागल्याने हेलिकॉप्टर कोसळले. त्यानंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. यावेळी आगीचे तांडव पाहायला मिळाले. या अपघातात वैमानिकाचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी झालेत.

हास्यकलाकार जसपाल भट्टी कार अपघातात ठार

Last Updated: Thursday, October 25, 2012, 10:30

प्रसिद्ध हास्यकलाकार जसपाल भट्टी यांचं निधन झालय. आज पहाटे तीनच्या सुमारास जालंदरजवळील शहाकोटमध्ये त्यांच्या कारला अपघात झाला त्यात त्यांचा मृत्यू झाला.

नेपाळ विमान अपघातात १९ ठार

Last Updated: Friday, September 28, 2012, 11:29

नेपाळची राजधानी काठमांडूजवळ विमानाला झालेल्या अपघातामध्ये १९ प्रवासी ठार झालेत. मृतांमध्ये १२ जण परदेशी नागरिक आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नायजेरियात भीषण विमान अपघात

Last Updated: Monday, June 4, 2012, 09:40

नायजेरियामधील लागोस शहरात प्रवासी विमान कोसळल्यानं तब्बल १५३ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होतोय. दाना एअरलाईन्सचं विमान लागोसमधून राजधानी अबुजाकडे उड्डाण करत होते.

‘पा’फेम तरुणी सचदेवचा विमान दुर्घटनेत बळी

Last Updated: Tuesday, May 15, 2012, 11:48

सोमवारी नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात १४ वर्षांच्या तरुणी सचदेवचाही बळी गेलाय. या अमिताभच्या ‘पा’ सिनेमातील छोट्या अमिताभच्या छोट्या मैत्रिणीचा चेहरा आजही सर्वांच्या लक्षात आहे.

बेपत्ता विमानाचे अवशेष आढळले

Last Updated: Thursday, May 10, 2012, 18:10

इंडोनेशियामध्ये बुधवारी बेपत्ता झालेले रशियाचं सुखोई विमानाचे अवशेष शोधपथकाला सापडलेत. शोधपथकानं पहाडांवर 5 हजार पाचशे फूट उंचीवर विमानाचे अवशेष दिसून आलेत.

मुख्यमंत्री अर्जुन मुंडांच्या हेलिकॉप्टरला अपघात

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 13:35

झारखंडचे मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. रांची विंमानतळावर लँडिंग दरम्यान हा अपघात झाला आहे. अपघातातून मुंडा बचावले असून त्यांच्या पायाला जखम झाली आहे.

बस अपघातात २२ विद्यार्थी ठार

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 17:53

बेल्जियन येथील बस अपघातात २२ ठार तर २४ जण जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांना घेऊन तीन बस जात होत्या. यातील एक बस स्विस बोगद्यातील भिंतीवर जोरदार धडकली. या अपघातात २२ विद्यार्थी चिरडले गेले. अपघाताच्यावेळी विद्यार्थ्यांच्या किंचाळ्यांनी परीसर हादरून गेला.

नाटो हेलिकॉप्टरला अपघात, सहा ठार

Last Updated: Friday, January 20, 2012, 14:56

दक्षिण अफगाणिस्तानात झालेल्या नाटोच्या हेलिकॉप्टर अपघातात अमेरिकेचे सहा सैनिक ठार झाले आहेत. या महिन्यात आतापर्यंत २४ सैनिक मारले गेले आहेत. हेलिकॉप्टरला गुरूवारी रात्री अपघात झाल्याची माहिती नाटोच्या सूत्रांकडून देण्यात आली.

मनिलात विमान कोसळून १३ ठार

Last Updated: Saturday, December 10, 2011, 11:11

फिलिपाईन्सची राजधानी मनिलापासून काही अंतरावर एक विमान शाळेवर कोसळले. या विमान अपघातात सात जण ठार झाले.