Last Updated: Wednesday, August 22, 2012, 18:40
www.24taas.com, मुंबईमानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात एक लाख बांग्लादेशी मतदार शोधून दाखवल्यास राज ठाकरे यांना दोन कोटी रुपयांचे बक्षीस देऊ. असं आव्हान सपा नेते अबू आझमी यांनी दिलं आहे.
राज ठाकरे यांनी आझाद मैदानावरच्या सभेत केलेल्या टीकेला आझमी यांनी उत्तर दिलं. राज ठाकरे यांना आव्हान देताना थेट दोन कोटींचा चेकच प्रसारमाध्यमांना दाखवला. सीएसटीचा हिंसाचार ड्रग्ज माफियांनी घडवून आणल्याचा दावाही त्यांनी केला.
शिवाय 11 ऑगस्टला आझाद मैदानातल्या कार्यक्रमातल्या स्टेजवर मनसेचा कुर्ल्यातील नेता हाजी अराफात उपस्थित होता असा दावाही त्यांनीही केला. राज ठाकरे हे कूप मंडूक प्रवृत्तीचे असून शिव्या देऊन ते टाळ्या मिळवतात असा आरोपही त्यांनी केला.
First Published: Wednesday, August 22, 2012, 16:12