Last Updated: Thursday, March 28, 2013, 07:12
www.24taas.com, मुंबईअभिनेते सदाशिव अमरापूरकरांना शिविगाळ झाल्याची घटना मुंबईतल्या वर्सोव्यात घडली आहे. वर्सोव्यातील पंचवटी सोसायटीत हा प्रकार घडला.
पंचवटी सोसायटीतले रहिवासी धुळवडीच्या निमित्तानं रात्रभर डिजे लावून रेन डान्स करत होते. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असल्याचं पाहून बाजुच्या सोसायटीत राहणा-या सदाशिव अमरापूरकरांनी रेन डान्स थांबवण्याचं आवाहन केलं.
मात्र पंचवटीतल्या रहिवाशांनी पाण्याची नासाडी थांबवली तर नाहीच उलट अमरापूरकरांना शिवीगाळ करत त्यांना धक्काबुक्की केली. या सर्व प्रकाराची अमरापूरकरांनी पोलिसांत वारंवार तक्रार केली. मात्र त्यांच्या तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचं अमरापूरकरांचं म्हणणं आहे. ब-याच कालावधीनंतर पोलिसांनी याबाबत पंचवटी रहिवाशांविरोधात तक्रार दाखल करून घेतली.
First Published: Wednesday, March 27, 2013, 22:32