Last Updated: Saturday, November 10, 2012, 22:52
www.24taas.com, मुंबईमुबंईत महिला असुरक्षित असल्याचे आज पुन्हा एकदा दिसून आले आहे. महिलांवर होणाऱ्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वरळीत डॉक्टर तरुणीवर झालेल्या ऍसिड हल्ला प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
जेरीट जॉन असं या आरोपीचं नाव आहे. एकतर्फी प्रेमातून त्यानं हा हल्ला केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. दोन दिवसांपूर्वी तरुणीवर हल्ला झाला होता.
तेव्हापासून जेरिट फरार होता. तो नालासोपा-यात एका हॉटेलमध्ये लपून बसला असल्याची माहिती मिळाल्यावर नालासोपारा पोलिसांनी ही कारवाई केली.
First Published: Saturday, November 10, 2012, 22:36