Last Updated: Thursday, May 2, 2013, 15:47
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबईतल्या वांद्रे रेल्वे टर्मिनसमध्ये दोन तरुणींवर अॅसीड हल्ला करण्यात आलाय. हल्ला झालेल्या तरुणी दिल्लीच्या राहणा-या आहेत. हे कुटुंब दिल्लीतून मुंबईत आलं होतं.
मुंबईत मेडिकल कॉलेजमधील एडमिशनसाठी ते आल्याचं सांगण्यात येतय. सकाळी ट्रेनमधून उतरल्यानंतर तोंडाला रुमाल बांधलेल्या तरुणानं अॅसीड फेकलं यावेळी झालेल्या झटापट झाली. यात तरुणीच्या वडिलांसह अन्य दोघं जणही जखमी झालेत.
पीडित तरुणीवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अॅसीड फेकणा-याचा शोध सुरु आहे.
First Published: Thursday, May 2, 2013, 15:47