Last Updated: Friday, January 10, 2014, 22:08
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई अभिनेता हृतिक रोशनने उद्घाटन केलेल्या ज्वेलरी शॉपमध्ये चोरी झाल्याचे उघड झाले आहे. उद्घाटनाच्या दिवशीच ज्वेलरी शॉपमध्ये चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
जॉय अलुकास या ज्वेलरी शॉपच्या मुलुंड शाखेचे तीन जानेवारी रोजी हृतिक रोशनच्या हस्ते उद्घाटन झाले. हृतिकला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. त्याचाच फायदा घेत दोन स्त्रिया आणि एका पुरुषानं दागिने खरेदी करण्याचं नाटक केलं. काही दागिनेही पाहिले. मात्र कोणाचही लक्ष नसल्याचा फायदा घेत त्यांनी चार लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला.
चोरीचा प्रकार लक्षात येताच शोरुमच्या संचालकांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहाणी केली. यावेळी दोन महिला आणि एक पुरुष दागिने लंपास करत असल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, January 10, 2014, 22:01