Last Updated: Monday, September 24, 2012, 14:25
www.24taas.com, मुंबई मुंबईत दिवसेंदिवस वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरूणींची संख्या वाढते आहे. जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देहविक्रय करणार्या रशियन तरुणी, झारखंड येथील एक मॉडेल व दोन दलालांना पोलिसांनी अटक केली. यातील झारखंडमधील मॉडेल याआधी हवाईसुंदरी म्हणून काम करीत होती. मात्र तिची नोकरी जाताच ती वेश्याव्यवसायात गुंतली. जुहू येथील हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर मुंबईतील जुहू परिसरातील पंचताराकित हॉटेल नोवेटल येथे छापेमारी केली. तेव्हा चार लोकांना पकडले. पोलिसांनी बनावट ग्राहकांच्या माध्यमांतून दलालांकडे संपर्क साधला. या वेळी त्याने रशियन तरुणीसाठी 20 हजार तर झारखंडच्या मॉडेलसाठी 25 हजार असा भाव सांगितला.
एकूण 45 हजार रुपये दिल्यानंतर त्याने हॉटेलमधील रुममध्ये वाट पाहत असलेल्या तरुणींकडे त्यांना नेले. याच वेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना अटक केली. अटक केल्यानंतर रशियन तरुणी आणि झारखंडमधील मॉडेलची सुधारगृहात रवानगी करण्यात आली.
First Published: Monday, September 24, 2012, 14:25