`शुभदेतले आठ बेनामी फ्लॅट अजित पवारांचे`, AJIT PAWAR HOLD 8 FLATS IN SHUBHADA

`शुभदेतले आठ बेनामी फ्लॅट अजित पवारांचे`

`शुभदेतले आठ बेनामी फ्लॅट अजित पवारांचे`
www.24taas.com, मुंबई

मुंबईमध्ये वरळीच्या शुभदा हाऊसिंग सोसायटीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसऱ्यांच्या नावावर फ्लॅट घेतल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री रणजीत देशमुख यांनी केलाय.

आदिवासी आणि इतर मागास वर्गाकरता आरक्षित असतात. असे आठ फ्लॅट पवार यांनी इतरांच्या नावावर विकत घेतल्याचा दावा रणजीत देशमुख यांनी केलाय. यातला प्रत्येक फ्लॅट ६०० चौरस फुटांचा आहे. काँग्रेस खासदार विजय दर्डा यांनीही याच प्रकारे तिथं फ्लॅट घेतल्याचा दावा त्यांनी केलाय.

याच इमारतीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचाही फ्लॅट आहे. त्यांनादेखील महापालिकेनं नोटीस धाडलीय. याबाबत देशमुखांना विचारलं असता ‘गाळ्यांमध्ये केलेल्या बेकायदा बांधकामांबाबत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या लक्षात आणून दिलं असता मुंबई महानगर पालिकेमार्फत प्रकरण पुढे जाणार नाही, याची काळजी घेऊ’ असं आश्वासन मुंडे यांनी दिल्याचा देशमुखांचा दावा आहे.

महापालिकेत भाजप-सेनेची सत्ता असल्यामुळे मुंडे असं म्हणू शकल्याचा दावाही रणजित देशमुखांनी केलाय. या इमारतीत स्वतः देशमुख यांचाही फ्लॅट आहे. आपल्यालाही मुंबई महापालिकेची नोटीस मिळाल्याचं त्यांनी मान्य केलंय.

First Published: Saturday, April 20, 2013, 09:38


comments powered by Disqus