Last Updated: Monday, October 14, 2013, 14:55
www.24taas.com, झी मीडिया मुंबईकालच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. योग्य वेळी प्रत्युत्तर देऊ असं उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अजित पवार म्हणाले आहेत.
आमच्याही सभा होतात. आम्हीही योग्य वेळी टीकेला उत्तर देऊ अशा शब्दांत अजित पवारांनी टीकेला प्रत्युत्तर दिलंय. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
४८व्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख यांनी विरोधकांवर टिकेची तोफ डागली होती. यावेळी शरद पवार यांना टिकेचे लक्ष्य करत उद्धव ठाकरे यांनी त्यांचा उल्लेख थकलेला नवरा असा केला होता. तर अजित पवारांना पवारांचा दिवटा पुतणा असं उद्धव म्हणाले होते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, October 14, 2013, 14:55