अजित पवारांचा २२ हजार कोटींचा घोटाळा - दमानिया, Ajit Pawar`s 22 thousand crore scam - Anjali damaniy

अजित पवारांचा २२ हजार कोटींचा घोटाळा - दमानिया

अजित पवारांचा २२ हजार कोटींचा घोटाळा - दमानिया
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राज्याच्या ऊर्जा खात्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २२ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया यांनी केलाय. तर राष्ट्रवादीने आपवरही आरोप केलाय. बिल्डर आणि आपचं साठलोटं असल्याचं म्हटलंय.

ऊर्जा खात्याचा घोटाळा झाला नसता तर राज्यात ५० टक्के विजेचे दर कमी झाले असते असा दावाही अंजली दमानिया यांनी केलाय. गेल्या चार वर्षांपासून एमईआरसीला चेअरमन नाही. यामागेही राष्ट्रवादी काँग्रेसच असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

दरम्यान, आपचे नेते मयांक गांधी आणि योगेंद्र यादव यांची मुंबई बिल्डर्ससोबत गुप्त बैठक झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. गांधी यांच्या रिमेकिंग मुंबई प्रोजेक्टबाबत बिल्डर्स आणि सिंगापूरच्या कंपनीसोबत ही बैठक झाल्याचं प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.

तसंच अंजली दमानिया यांनी कोंढाणे धरणात आपली जमीन जाऊ नये, त्याऐवजी आदिवासींची जमीन घ्यावी, यासाठी पत्र लिहिल्याचा आरोपही त्यांनी केलाय. आदिवासी आणि बेघरांसाठी लढणार्या मेधा पाटकर यांनी गांधी आणि दमानियांबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसनं केलीये.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 20, 2014, 16:38


comments powered by Disqus