Last Updated: Tuesday, April 9, 2013, 17:12
www.24taas.com, मुंबईउपमुख्यमंत्री अजित पवारांनी आतापर्यंत ४ वेळा माफी मागूनही विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातल्यामुळं विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
अजितदादांच्या बेताल वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांनीही माफी मागावी अशी नवी मागणी विरोधकांनी केली आहे. शिवसेनेनं विधानसभेत निंदाव्यंजक प्रस्ताव मांडला होता. मात्र अजित पवारांनी माफी मागितल्यामुळं हा प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळला.
विधानसभेत विरोधकांचा गोंधळ सुरू होता. त्यामुळं सलग दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावं लागलं. तर दुसरीकडे विधान परिषदेतही काही काळासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं होतं.
First Published: Tuesday, April 9, 2013, 16:50