Last Updated: Wednesday, January 8, 2014, 21:00
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईराज्य सरकारच्या संथ कारभारावर उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त झालेत. आधी सुधारणा करा नाहीतर आम्ही सरकारमधून बाहेर पडू असा गंभीर इशारा अजित पवार यांनी काँग्रेसला दिला आहे.
आज राज्यमंत्रीमंडळाची बैठक झाली. यावेळी या बैठकीतच पवार यांनी गर्भित आणि निर्वाणीचा इशारा दिला. राज्य सरकारचा कारभार सुधारणार नसेल, तर सरकारमधून बाहेर पडू आणि बाहेरून पाठिंबा देऊ असा इशाराच त्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिला. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील धुसफूस पु्न्हा चव्हाट्यावर आलेय. मात्र, राष्ट्रवादीचे टार्गेट मुख्यमंत्री असल्याचे या निमित्ताने दिसून आलेय.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकार कामाला लागले आहे. मराठा आरक्षणानंतर आता मुस्लिमांना आरक्षणाचे गाजर सरकारने दाखवले आहे. तसंच कामांचा निपटारा करण्यासाठी आठवड्यातून दोनदा मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिलीय.
दरम्यान, अजित पवार यांच्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने पुन्हा सह्याद्रीवर बैठक घेतली आहे. याबैठकीत राज्यातील प्रमुख अधिकारी आणि पेंडीग असलेल्या फाईलीची तपासणी करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या इशाऱ्यानंतर सरकार कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Wednesday, January 8, 2014, 19:45