बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली – संजय राऊत, AJMAL KASAB EXECUTED,

बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली – संजय राऊत

बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली – संजय राऊत
www.24taas.com,मुंबई

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानचा क्रुरकर्मा अजमल कसाब याला फाशी देऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खरी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.

आज बुधवारी सकाळी ७.३० वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याची माहिती, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिल्यानंतर सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारने जगाला दाखवून दिले आहे की, आम्ही किती सक्षम आहोत. देण्यात आलेली कसाबला फाशी ही बाळासाहेबांसाठी श्रद्धांजली आहे, असे राऊत यांनी ‘झी २४ तास’शी बोलताना सांगितले.

२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कसाबचा दयेचा अर्ज मंगळवारी फेटाळला होता. राष्ट्रपती यांनी हा अर्ज फेटाळला ते योग्य होते. आणि लगेच फाशी दिली, ही स्वागतार्ह बाब आहे, असे राऊत म्हणाले.

त्याआधी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी कसाबला येरवडा कारागृहात सकाळी साडेसात वाजता फाशी देण्यात आल्याची माहिती दिली. तर डॉक्टरांनी कसाबला मृत घोषित केले, असे ते म्हणालेत.

First Published: Wednesday, November 21, 2012, 09:21


comments powered by Disqus