कसाबचा शेवट, हल्ल्याचा घटनाक्रम, AJMAL KASAB EXECUTED

कसाबचा शेवट, हल्ल्याचा घटनाक्रम

कसाबचा शेवट, हल्ल्याचा घटनाक्रम
www.24taas.com,मुंबई

क्रुरकर्मा आणि पाकिस्तानी नागरिक. लष्कर-ए-तैयबा या संघटनेचा दहशतवादी असलेल्या अजमल कसाब याला फाशी देऊन त्याचा शेवट करण्यात आलाय. त्यांने आणि त्याचे सहकारी अन्य नऊ दहशतवाद्यांनी, २६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबईच्या विविध भागांत हल्ले करून तब्बल चार दिवस मुंबईला वेठीस धरले होते.

पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये क्रुरकर्मा अजमल कसाब हाच पोलिसांच्या हाती जिवंत सापडला होता. त्याला मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याच्यावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला होता. त्यामुळे देशभरतातून संताप व्यक्त होत होता. काल त्याला पुण्यातील येरवडा तुरूंगात हलविण्यात आले होते. आज सकाळी त्याला फाशी देण्यात आले. त्यांने केलेल्या या दहशतवादी हल्ल्याचा घटनाक्रम.

२००८
नोव्हेंबर २६ - कसाब आणि त्याच्या नऊ पाकिस्तानी साथीदारांचा दक्षिण मुंबईतील विविध भागांमध्ये अंदाधुंद गोळीबार.

नोव्हेंबर २७- मध्यरात्री दीड वाजता कसाबला पकडून अटक. त्याला नायर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले.

नोव्हेंबर २९- पोलिसांनी कसाबचा जबाब नोंदविला. कसाबकडून गुन्ह्यांची कबुली.

नोव्हेंबर २९- दहशतवाद्यांच्या हल्ल्यातील सर्व ठिकाणे ६० तासांनंतर सुरक्षित करण्यात यश, नऊ दहशतवादी ठार.

नोव्हेंबर ३०- कसाबची पोलिसांसमोर कबुली.

डिसेंबर २७, २८- ओळख परेड घेण्यात आली.

२००९

जानेवारी १३- एम. एल. तहलियानी यांची २६-११ च्या खटल्यासाठी विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती.

जानेवारी १६- कसाबच्या खटल्यासाठी आर्थर रोड जेलची निवड.


फेब्रुवारी ५- कुबेर जहाजावर मिळालेल्या वस्तुंसह कसाबच्या डीएनए नमुन्याची चाचणी

फेब्रुवारी २०,२१- न्या. सौ. आर. व्ही. सावंत-वागुले यांच्यापुढे कसाबची कबुली.

फेब्रुवारी २२- विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती.

फेब्रुवारी २५- कसाबसह इतर दोघांविरुद्ध एस्प्लानेड महानगर न्यायालयात आरोपपत्र दाखल.

एप्रिल १- विशेष न्यायालयाकडून अंजली वाघमारे यांची कसाबचे वकील म्हणून नेमणूक.

एप्रिल १५- २६-११ च्या खटल्याला सुरुवात.

एप्रिल १५- अंजली वाघमारे यांची नियुक्ती रद्द.

एप्रिल १६- एस.जी. अब्बास काझमी कसाबचे नवे वकील म्हणून नेमणूक.

एप्रिल १७- कसाबचा कबुलीजबाब न्यायालयासमोर मांडण्यात आला.

एप्रिल २०- सरकारी पक्षातर्फे कसाबवर ३१२ आरोप.

एप्रिल २९- कसाब अल्पवयीन असल्याचा वकिलाचा दावा तज्ज्ञांनी फेटाळला.

मे ६- आरोप निश्चित, कसाबवर केलेले ८६ आरोप त्याने नाकारले.

मे ८- पहिल्या साक्षीदाराने कसाबला ओळखले.

जून २३- हफीज सईद, झाकी-उर-रेहमान लखवी यांच्यासह २२ जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी.

जून २५- कसाबला अल्सरचा त्रास होत असल्याचे न्यायालयाने सांगितले.

जुलै २०- विशेष न्यायाधीश एम. एल. तहलियानी यांच्यापुढे कसाबने गुन्ह्यांची कबुली दिली.

नोव्हेंबर ३०- कसाबचे वकील अब्बास काझमी यांना हटवले.

डिसेंबर १- काझमी यांची जागा के. पी. पवार यांनी घेतली.

डिसेंबर १६- सरकारी पक्षाने २६-११ चा खटला पूर्ण केला.

डिसेंबर १८- कसाब सर्व आरोप नाकारले.

२०१०

फेब्रुवारी ११- खटल्यातील एका आरोपीचे वकील शाहीद आझमी यांची कुर्ला येथे हत्या.

फेब्रवारी २२- डेव्हिड कोलमन हेडलीचा मुद्दा न्यायालयात उपस्थित झाला.

फेब्रुवारी २३- अंतिम प्रतिवाद ९ मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय.

मार्च ३१- निकालाची तारीख ३ मे निश्चित.

मे ६- कसाबला फाशीची शिक्षा.

जून ८- उच्च न्यायालयात अपीलसाठी आमीन सोलकर, फराना शाह यांची कसाबचे वकील म्हणून नियुक्ती.

ऑक्टोबर १८- उच्च न्यायालयात सुनावणी सुरु.

ऑक्टोबर १९- संताप व्यक्त करीत न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याची कसाबची इच्छा. कॅमेरावर थुंकून मला अमेरिकेला पाठवा असे कसाब म्हणतो. न्यायाधीश त्याला चांगले वर्तन करण्याची सूचना देतात.

ऑक्टोबर २१- प्रत्यक्ष हजर राहण्याची इच्छा पुन्हा वकिलांकडे कसाबने व्यक्त केली.

ऑक्टोबर २५- उच्च न्यायालयलाच्या न्यायाधीशांनी कसाब आणि अबू इस्माईल यांच्या गोळीबाराचे सीसीटीव्ही चित्रण पाहिले.

ऑक्टोबर २७- सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या निर्णयाचे समर्थन.

ऑक्टोबर २९- वारंवार जबाब फिरवून कसाबने न्यायालयाला गोंधळात टाकले, असा निकम यांचा प्रतिवाद.

नोव्हेंबर ३०- भारतावर युद्ध लादण्याचा आरोप कसाबवर करण्यात आला नसल्याचा प्रतिवाद ऍड. सोलकर यांनी केला.

डिसेंबर २- कसाब पाकिस्तानहून नावेतून आला नाही. छोट्या नावेत दहाजण बसू शकत नाहीत, असा युक्तिवाद त्याचे वकिलांनी केला.

२०११
जानेवारी १७- न्यायालयाने ७ फेब्रुवारीपर्यंत निकाल राखून ठेवला.

फेब्रुवारी ७- मुंबई उच्च न्यायालयाने २१ फेब्रुवारी ही निकालाची तारीख निश्चित केली.

फेब्रुवारी २१- कसाबच्या फाशीचा निर्णय कायम.

जुलै २९- फाशीच्या आदेशाला कसाबचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान.

२०१२
ऑगस्ट २९- सर्वोच्च न्यायालयाने कसाबला फाशीची शिक्षा कायम ठेवली.

८ नोव्हेंबर - राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडून कसाबचा दयेचा अर्ज फेटाळण्यात आला

२१ नोव्हेंबर - पुण्यातील येरवडा कारागृहात सकाळी साडेसात वाजता फासावर लटकविण्यात आले

First Published: Wednesday, November 21, 2012, 09:36


comments powered by Disqus