कसाबचा दयेचा अर्ज, Ajmal Kasab`s mercy petition

कसाबचा दयेचा अर्ज

कसाबचा दयेचा अर्ज
www.24taas.com,मुंबई

दहशतवादी अजमल कसाबनं राष्ट्रपतींकडं दयेचा अर्ज केलाय. सुप्रीम कोर्टानं कसाबची फाशीची शिक्षा कायम केलीये. त्यानंतर कसाबनं आज आर्थर रोड तुरुंग अधीक्षकांमार्फत राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केलाय.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पापांचे बळी घेणा-या कसाबला आता फाशीची शिक्षा नकोय. त्याला फाशीतून माफी हवीये. यासाठी त्यानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडे अर्ज केलाय.

मुंबईत करण्यात आलेल्या अनेक निरपराध लोकांचे बळी गेले होते. ताज हॉटेलमध्ये अनेकांना ओलीस धरून काहींचा ठार मारले होते. मुंबईल हल्ल्याप्रकरणी कसाब दोषी ठरल्याने त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

First Published: Tuesday, September 18, 2012, 13:11


comments powered by Disqus