Last Updated: Wednesday, April 9, 2014, 16:56
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईपश्चिम उपनगरात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा सीरियल मोलेस्टर आता दक्षिण मध्य मुंबईत सक्रिय झाला आहे. त्यानं सायनमध्ये १३ वर्षीय शाळकरी मुलीला आपलं लक्ष्य केलं आहे.
सोमवारी दुपारी ही शाळकरी मुलगी घरी परतत असतांना तिला रस्त्यातच अडवण्यात आलं. तुझ्या वडिलांशी बोलायचं आहे असं सांगत तिला वल्लभदास मार्गावरील एका इमारतीच्या आडोशाला नेत त्यानं तिचा विनयभंग केला.
त्या मुलीनं आराडाओरडा केल्यानंतर तो तिथून निघून गेला. या सीरियल मोलेस्टरवर सायन पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानं गेल्या दोन महिन्यात ८ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 9, 2014, 16:56