Last Updated: Tuesday, April 2, 2013, 21:24
www.24taas.com, मुंबईउद्योगपती अंबानी बंधूंनी वेगळे झाल्यानंतर पहिल्यांदा हात मिळवून टेलिकॉम क्षेत्रात काम करण्याचे ठरवले आहे.
मुकेश अंबानी यांची रिलायन्स जियो इन्फोकॉम आणि अनिल यांची कंपनी आर-कॉम या दोन कंपन्यांमध्ये १२०० कोटींचा करार झाला आहे. अंबांनी बंधूंच्या कंपन्यांमध्ये हा करार झाल्यानंतर शेअर बाजारात दोन्ही कंपन्यांचे शेअर्स चांगलेच वधारले.
या करारानुसार रिलायन्स जिओ ही अनिल यांच्या कंपनीला सेवा पुरवणार आहे. त्यानुसार मुकेश यांची रिलायन्स जिओ ही अनिल यांच्या आर कॉमला 4 जी सुविधा पुरवणार आहे. त्याबदल्यात आरकॉमच्या 1 लाख 20 हजार किलोमीटर फायबर ऑप्टिक नेटवर्कचा वापर रिलायन्स जिओला करता येणार आहे.
First Published: Tuesday, April 2, 2013, 21:18