`फोर्ब्स`च्या यादीत अंबानींचे `अँटिलिया' जगातील महागडे घर

Last Updated: Thursday, May 15, 2014, 15:53

भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे मुंबईतील `अँटिला` हे गगनचुंबी आलिशान निवासस्थान जगातील सर्वांत महागडे घर ठरले आहे. याबाबत `फोर्ब्स`ने एक यादी प्रसिद्ध केली आहे.

भारतीय अब्जाधीशांमध्ये अंबानी पहिल्या क्रमांकावर

Last Updated: Monday, March 3, 2014, 12:38

देशात सर्वात श्रींमत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स इन्डस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या नावाचा समावेश झालाय.

`मुकेश अंबानी `मोदी-राहुल`ना खिशात घालून फिरतात`

Last Updated: Friday, February 21, 2014, 12:49

उद्योगपती मुकेश अंबांनी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना खिशात घालून फिरतात, असा घणाघाती आरोप दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

अंबानी पुत्रानं केला अपघात? पोलीस कुणाला वाचवत आहेत?

Last Updated: Tuesday, December 10, 2013, 23:27

‘रिलायन्स पोर्ट’च्या नावाने रजिस्टर्ड असलेली ही आलिशान कार ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानींचे पुत्र आकाश अंबानी चालवत होते, असा खळबळजनक आरोप जखमी महिलेनं केलाय. परंतु रिलायन्सच्या प्रवक्त्याने हा आरोप चुकीचा असल्याचं सांगितलंय.

जेव्हा अंबानींच्या घरी सचिन तेंडुलकरची फौज धडकते...

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 08:33

चॅम्पियन्स लीग विजेत्या मुंबई इंडियन्सच्य़ा टीमच्या सन्मानार्थ आज टीमचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी पार्टी देण्यात आली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह टीमचे सारे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यावेळी उपस्थित होता.

‘झेड’ सुरक्षित मुकेश अंबानी!

Last Updated: Thursday, August 8, 2013, 18:58

प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची ‘झेड’ सुरक्षा काढण्याबाबतची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावलीय.

मुकेश अंबानींना कशासाठी सुरक्षा, कोर्टाने फटकारले

Last Updated: Wednesday, May 1, 2013, 22:59

देशात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तिला सुरक्षा मिळते, मात्र सर्वसामान्यांचे काय? अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले आहे. उद्योगपती मुकेश अंबानींना पुरविण्यात आलेल्या सुरक्षेच्या मुद्दावर कोर्टानं सरकारला फटकारलंय.

अंबानींना सुरक्षा देण्यात सरकार सकारात्मक

Last Updated: Monday, April 22, 2013, 21:04

धोका असलेल्या उद्योगपतींना सुरक्षा देण्यास काहीच हरकत नाही. सुरक्षेसाठी लागणारा खर्च उद्योगपतींकडून देण्यात येणार आहे.

मुकेश अंबानी यांना झेड दर्जाची सुरक्षा

Last Updated: Monday, April 22, 2013, 12:30

उद्योगपती आणि रिलायन्स इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयानं मंजूर केला आहे. त्यामुळे अंबानी यांनी आता खास सुरक्षा मिळणार आहे.

अंबानी बंधू साथसाथ, टेलिकॉमसाठी दिला हातात हात

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 21:24

उद्योगपती अंबानी बंधूंनी वेगळे झाल्यानंतर पहिल्यांदा हात मिळवून टेलिकॉम क्षेत्रात काम करण्याचे ठरवले आहे.

‘मोदींना मदत केली तर...!’ अंबानींना दहशतवाद्यांची धमकी

Last Updated: Sunday, March 3, 2013, 19:44

‘गुजरातमध्ये गुंतवणूक आणि नरेंद्र मोदींचं समर्थन बंद करा... अन्यथा…’ अशी धमकी देणारं पत्र रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मिळालंय.

मुकेश अंबानींना दहशतवाद्यांची धमकी

Last Updated: Wednesday, February 27, 2013, 16:25

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसोबत मैत्री वाढविली, तसेच गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरुच ठेवली तर ठार करू, असं धमकीचं पत्र रिलायन्स इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना आले आहे.

केजरीवालांनी उघड केले अंबानी बंधूंचे अकाउंट नंबर्स

Last Updated: Monday, December 10, 2012, 17:58

अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी या पक्षाच्या स्थापनेपूर्वीच अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत खळबळ माजवली होती. यावेळी मुख्यत्वे केजरीवालांचा रोख होता तो अंबानी बंधूंवरच. मात्र आता त्यांनी अंबानी बंधूंचे बँक अकाउंट नंबरही जनतेसमोर उघडे केले आहेत.

मुकेश अंबानींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न

Last Updated: Sunday, November 11, 2012, 16:49

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा काळा पैसा स्वीस बॅंकेत ठेवण्यात आला आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केल्यानंतर अंबानी यांचा काळापैसा त्वरीत भारतात आणावा आणि सरकारकडे सोपवावा, अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांकडून केली. यावेळी काही कार्यकर्ते अंबानींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला.

या वर्षीचे सर्वाधिक श्रीमंत भारतीय

Last Updated: Thursday, October 25, 2012, 11:58

सलग पाचव्या वर्षीही मुकेश अंबानी सर्वाधिक श्रीमंत भारतीय ठरले आहेत. फोर्ब्स मासिकाने नुकतीच श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली. यात मुकेश अंबानी पुन्हा अव्वाल स्थानावर आहेत. खरंतर गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या संपत्तीत घट होत आहे. मात्र नुकसान होत असूनही त्यांची संपत्ती २१ अब्ज डॉलर्स एवढी अहे.

रिलायन्सचं ब्रॉडबँड लवकरच देशभरात

Last Updated: Thursday, June 7, 2012, 16:21

रिलायन्स इंडस्ट्रीज लवकरच देशभरात आपली ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. शिक्षण, सुरक्षा, वित्त सेवा आणि मनोरंजन यांसारख्या क्षेत्रांना इंटरनेट सेवा पुरवण्याच्या योजनांवर शेवटच्या टप्प्यात असल्याचं सुत्रांनी म्हटलंय.

सचिनची फटकेबाजी कुछ कुछ होता है- प्रियांका

Last Updated: Thursday, March 29, 2012, 09:34

जब सचिनसर घुमा के शॉट मारते है तो तुम नही समझोगी अंजली कुछ कुछ होता है, हे वाक्य दुसऱ्या तिसऱ्या कुणी म्हटलेलं नसून लाखों जवाँ दिलों की धडकन दस्तुरखुद्द प्रियांका चोप्राने म्ह्टलेलं आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० वे शतक झळकावल्याच्या सन्मानार्थ आयोजीत पार्टीत प्रियांकाने ही गुगली टाकली.

धीरुभाई अंबानींच्या स्मारकाचे अनावरण

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 20:06

रिलायन्स उद्योगसमुहाचे संस्थापक धीरुभाई अंबानींच्या स्मारकाचे उदघाटन जूनागढ जिल्ह्यातील चोरवाडमध्ये करण्यात आलं आहे. यावेळेस संपूर्ण अंबानी कुटुंब उपस्थित होतं. अंबानी कुटुंबाचे अध्यात्मिक गुरु रमेश भाई ओझा यांच्या हस्ते या स्मारकाचे अनावरण करण्यात आलं.

अंबानी बंधू पुन्हा एकत्र ?

Last Updated: Tuesday, December 27, 2011, 15:43

येत्या बुधवारी जूनागढ जिल्ह्यातील चोरवाड येथे मुकेश आणि अनिलसहित संपूर्ण अंबानी कुटुंब एकत्र येणार आहे. बुधवारी धीरूभाईंच्या स्मारकाचं उद्घाटन होणार असून त्यासाठी दोघेही अंबानी बंधू एकत्र येणार आहेत.

मुकेश अंबानी खाऊ गल्लीत भेटीला येणार

Last Updated: Monday, December 12, 2011, 18:20

देशातील खाजगी क्षेत्रातील बलाढ्य कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज पुढच्या वर्षी फास्ट फूड व्यवसायात प्रवेश करणार आहे. रिलायन्स या क्षेत्रात स्वताचा ब्रँड लँच करणार आहे. रिलायन्स याआधीच देशातील वेगाने वाढत्या युवा लोकसंख्येशी रिटेल आणि 4G वायरलेस सेवांच्या माध्यमातून नातं जोडलं आहे.