मनोहर जोशी नाराज, राहुल शेवाळे लोकसभेचे उमेदवार?, Angry Manohar Joshi, Rahul Shevale Lok Sabha candidate?

मनोहर जोशी नाराज, राहुल शेवाळे लोकसभेचे उमेदवार?

मनोहर जोशी नाराज, राहुल शेवाळे लोकसभेचे उमेदवार?
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची इच्छा मनोहर जोशी यांनी व्यक्त केल्यानंतर त्यांनी त्यादृष्टीनं तयारी देखील सुरू केली होती. मात्र शिवसेना पक्षानं विश्वासात न घेता मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे राहुल शेवाळेंना उमेदवारीसाठी पक्षनेतृत्वानं हिरवा कंदील दिला असल्याची जोरदार चर्चा आहे.

गणेशोत्सवात दक्षिण मध्य मुंबई भागात राहुल शेवाळेंची जोरदार पोस्टर लागल्यामुळे मनोहर जोशी अस्वस्थ झाले होते. दरम्यान प्रकृती अस्वाथ्य, वाढतं वय आणि सलग याठिकाणाहून दक्षिण मध्य मुंबईतून झालेला पराभव या सर्व गोष्टी लक्षात घेता मनोहर जोशींनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा हट्ट सो़डावा यासाठी पक्षातून आणि निकटवर्तीयांकडूनही समजूत काढली जात आहे.

राहुल शेवाळे यांना दक्षिण मध्य मतदारसंघाची उमेदवारी मिळण्याचं निश्चित असल्याचं समजून पोस्टरबाजी सुरु आहे. त्यामुळे मनोहर जोशींच्या नाराजीत आणखी भर पडली आहे. मुंबईत परतणारे मनोहर जोशी पक्षश्रेष्ठींकडे आपली नाराजी व्यक्त करणार असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, आपण पुन्हा दक्षिण मध्य मुंबईतून निवडून येऊ असा विश्वास जोशींना आहे. पण त्याआधीच राहुल शेवाळे यांच्या समर्थकांनी मतदारसंघात पोस्टरबाजी सुरु केली. यामुळे मनोहर जोशी यांचा पत्ता कट होण्याची शक्यता अधिक असल्याची जोरदार चर्चा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Tuesday, September 24, 2013, 11:00


comments powered by Disqus