पेड न्यूज : चार लोकसभा उमेदवारांवर ठपका

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 11:05

पेड न्यूजप्रकरणी चार लोकसभा उमेदवारांवर ठपका ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडे आलेल्या तक्रारीच्या छाननीनंतर हे चार उमेदवार दोषी आढळलेत. प्रथमदर्शनी हे चौघे दोषी आहेत, अशा ठपका निवडणूक आयोगाने ठेवला आहे.

पुण्यातील उमेदवाराचे भवितव्य नव्या मतदारांच्या हाती

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 09:37

नव्या दमाचे ७३ हजार मतदार ठरवणार आहेत, पुण्यातील उमेदवाराचे भवितव्य. पुणे लोकसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहेत. या यादीमध्ये लोकसभेसाठी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या म्हणजेच १८ ते २२ वयोगटातील मतदारांची संख्या तब्बल ७३ हजार ३४२ इतकी आहे.

लालकृष्ण अडवाणींच्या उमेदवारीबाबत तिढा

Last Updated: Wednesday, March 19, 2014, 09:57

भाजपा केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होत असून, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उमेदवारीबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान, गांधीनगरमधून ते निवडणूक लढविण्यास उत्सुक नाहीत. ते भोपाळ ईच्छूक असल्याने याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे आणखी दोन उमेदवार जाहीर

Last Updated: Friday, March 7, 2014, 13:36

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या आणखी दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. उस्मानाबाद मधून रवी गायकवाड यांना पुन्हा संधी देण्यात आली असून नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे शिवसेनेचे उमेदवार असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

भुजबळांच्या उमेदवारीला विरोध, मनमाडमध्ये रास्तारोको

Last Updated: Saturday, March 1, 2014, 17:51

राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेसाठी छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. आज येवला बंदची हाक देण्यात आलीये. मनमाड-नगर रस्त्यावर रास्तारोको करण्यात आलाय. भुजबळांच्या उमेदवारीला विरोध होतोय.

छगन भुजबळांचा शरद पवारांनी केला गेम!

Last Updated: Saturday, March 1, 2014, 11:17

नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळांची उमेदवारी जाहीर करून शरद पवारांनी त्यांचा गेम केल्याची खमंग चर्चा रंगलीय. अनेक दिग्गज मंत्र्यांना लोकसभेची उमेदवारी देणार, असं आधी पवारांनी सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात एकट्या भुजबळांनाच लोकसभेवर पाठवून पुतणे अजित पवारांचं वर्चस्व वाढवण्याचा पवारांचा प्रयत्न आहे की काय, असं बोललं जातंय. त्यामुळं भुजबळ समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदतोय.

लोकसभा निवडणूक : शिवसेनेचे २० उमेदवार जाहीर

Last Updated: Friday, February 28, 2014, 13:26

लोकसभा उमेदवार : शिवसेनेचे २० उमेदवार जाहीर

हे आहेत राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार

Last Updated: Saturday, February 22, 2014, 19:50

लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची आज आणि उद्या मुंबईत पुन्हा बैठक होत आहे. लोकसभेचे बहुतांश उमेदवार आधीच निश्चित करणाऱ्या राष्ट्रवादीला अजून चार ते पाच ठिकाणी उमेदवार निश्चित करता आलेले नाहीत. त्यासाठी स्वतः शरद पवार दोन दिवस मुंबईत बैठक घेत असून या बैठकीला पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

उमेदवाराला सोशल नेटवर्किंगचाही खर्च द्यावा लागणार

Last Updated: Thursday, February 13, 2014, 20:39

येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना आता सोशल नेटवर्किंगवर केलेल्या खर्चाचीही माहिती द्यावी लागणार आहे.

मनोहर जोशी नाराज, राहुल शेवाळे लोकसभेचे उमेदवार?

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 11:44

दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची इच्छा मनोहर जोशी यांनी व्यक्त केल्यानंतर त्यांनी त्यादृष्टीनं तयारी देखील सुरू केली होती. मात्र शिवसेना पक्षानं विश्वासात न घेता मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे राहुल शेवाळेंना उमेदवारीसाठी पक्षनेतृत्वानं हिरवा कंदील दिला असल्याची जोरदार चर्चा आहे.