राष्ट्रवादीने मुंबईतील `आप`चं कार्यालय फोडलं, App office on attacked in Mumbai

राष्ट्रवादीने मुंबईतील `आप`चं कार्यालय फोडलं

राष्ट्रवादीने मुंबईतील `आप`चं कार्यालय फोडलं
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईत आम आदमी पक्षाच्या कार्यालयाची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. राष्ट्रवादी आणि आपचा राडा रस्त्यावर आला. आपच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीनं आंदोलन केलंय.

आपनं राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी राष्ट्रवादी युवक विद्यार्थी काँग्रेसनं दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपच्या नेत्या अंजली दमानिया यांचा पुतळा जाळला. याप्रकरणी आपच्या शंभरपेक्षा जास्त कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

आपचे नेते मयांक गांधी यांना अटक करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीच्या ज्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला त्यांना याप्रकरणी पक्षातून काढून टाकण्याचे संकेत मिळाले आहेत. या हल्ल्यामुळे आम्हाला धक्का बसलाय, अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Saturday, February 22, 2014, 17:04


comments powered by Disqus