Last Updated: Sunday, January 27, 2013, 11:56
www.24taas.com, मुंबईमुंबईत टीव्ही एक्ट्रेसच्या कास्टिंग काऊचचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. निर्माता मुकेश मिश्रांवर एका एक्ट्रेसने कास्टिंग काऊच आणि बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
मुकेश मिश्रा असं या निर्मात्याचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. २८ वर्षीय एक्ट्रेसने मेकअप रुममध्ये घुसून या निर्मात्याने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पवई पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यामुळे महिला कितपत सुरक्षित आहेत हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या एका अभिनेत्रीचे लौंगिक शोषण केल्याच्या आरोपामुळे मुंबई पोलिसांनी निर्मात्याला अटक केली आहे.
First Published: Sunday, January 27, 2013, 11:48